कर्जतमधून तब्बल 48 संघांनी घेतले सहभाग..
नगरसेवक सोमनाथ ठोंबरे ,सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनी दिली तरुणांना संधी
कर्जत…
बघता बघता दोन वर्षे कोरोना काळात गेले होते. कोरोना विषाणूचे जगभरात थैमान सुरू झाल्यानंतर आणि जवळपास सर्व कामकाज ठप्प झाले होते.
त्यात सर्वसामान्यांवरच त्याचा परिणाम झाला नाही तर क्रीडाविश्वालाही त्याने या विळख्यात ओढले गेले होते. मात्र कुठे तरी कोरोनाचे सावट कमी होताच नगरसेवक सोमनाथ ठोंबरे आणि सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनी खेळाडूंमध्ये ऊर्जा शक्ती निर्माण करून सुरेश लाड चषक 2022 चे क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले.यावेळी क्रिकेट रसीकांनी गर्दी करून मनमुराद आनंद लुटला.

कर्जत भिसेगाव मैदानात सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी आणि नगरसेवक सोमनाथ ठोबरे यांनी माजी आमदार सुरेश लाड यांच्या नावाने सुरेश लाड चषक 2022 क्रिकेटचे सामने आयोजन केले आहे.
यामध्ये कर्जतमधील 48 संघांनी सहभाग घेतला होता. शुक्रवारी ते मंगळवारी असे पाच दिवस नाईट ओव्हर आर्मचे सामने ठेवले आहे.
यात पहिले पर्वचे उदघाटन माजी नगराध्यक्ष राजेश लाड, शरद लाड,तालुकाध्यक्ष भगवान चंचे, नेरळ ग्रामपंचायत सदस्य अतुल चंचे यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर दुसऱ्या पर्वचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, वैजनाथ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदेश गुरव,नगरसेवक उमेश गायकवाड, पोलीस पाटील संजय हजारे उपस्थित होते.

तर तिसऱ्या पर्व दिवशी माजी आमदार सुरेश लाड यांनी उपस्थित राहून खेळाडूंना मार्गदर्शन केले. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. यावेळी आयोजक अमोघ कुळकर्णी यांनी आलेल्या मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले असून माजी आमदार लाड यांना कृष्णाची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी तरुण वर्गात एकच जल्लोष होता.

खेळाडूंच्या आग्रहाखातर लाड यांना ही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नसून त्यांनीही सहभाग घेतला होता. कोरोना नंतर प्रथमच खेळाडूसाठी या संधीचे आयोजन केले होते. त्यामुळे खेळाडूंनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी ॲड संतोष बैलमारे,शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, उद्योजक मोहन ओसवाल, युवक तालुका अध्यक्ष सागर शेळके आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती.
कोरोना काळात अनेक खेळाडूंना मन मारून घरी बसावे लागले होते. कुठे तरी अमोघ कुळकर्णी यांनी खेळाडूंना मैदान खुले करून त्यांना खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली असे प्रतिपादन माजी आमदार सुरेश लाड यांनी केले.




















