कर्जत । नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर २३ वर्षीय तरुणाने बलात्कार केला. त्या मुलीच्या आई वडिलांना ठार मारण्याची धमकी देवून बलात्कार करणाऱ्या तरुणाने त्या मुलीचे व्हिडिओ व्हायरल केले असून याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखलझाला आहे.कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेऊन व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय दशरथ ऐनकर वय अंदाजे २३ वर्ष हा तरुण सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
फिर्यादी मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही पिडीतमुलगी तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तुझे आई वडीलांना ठार मारन टाकेन अशी धमकी देऊन या तरुणाने तिची इच्छा नसतानाही वेळोवेळी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने पिडीतेसोबत शरीर संबंध करतानाचा व्हीडीओत्याचे मोबाईलमध्ये बनवून सदरचा व्हीडीओ इंटरनेटच्या माध्यमातुन प्रसारीत केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी डी.डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे अधिक तपास करीत आहेत.





















