जन्म.२२ जून १९६५ इलाहाबाद येथे.
अनुभव सिन्हा यांचे शालेय शिक्षण इलाहाबाद मध्ये झाले. अनुभव सिन्हा यांनी अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटीतून मेकॅनिकल इंजिनीयरिंग मध्ये डिग्री मिळवली. दोन वर्षे दिल्ली मध्ये इंजीनियर म्हणून नोकरी केल्यावर ते मुंबईला आले. तेथे त्यांनी पंकज पाराशार यांच्या बरोबर असिस्टट डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २००१ मध्ये आलेला ‘तुम बिन’ हा अनुभव सिन्हा यांचा स्वतंत्र दिग्दर्शनातील पहिला चित्रपट होता. हा चित्रपट टी सिरीजने निर्माण केला होता.ही एक लव स्टोरी होती.यात प्रियांशु चटर्जी, संदली सिन्हा, हिमांशु मलिक, राकेश वशिष्ठ व अमृता प्रकाश यांनी भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठीक ठाक चालला. या चित्रपटाचा ‘फिर एला चेप्पनु’ या नावाने तेलगु मध्ये रीमेक बनवला गेला. याच चित्रपटाचा सीक्वल २०१६ मध्ये तुम बिन-2 या नावाने अनुभव सिन्हा यांनी बनवला होता. अनुभव सिन्हा यांनी दुसरा चित्रपट २००३ मध्ये ‘आपको पहले भी कहीं देखा है’ या नावे बनवला होता. यातील लेखनपण अनुभव सिन्हा यांचे होते. या चित्रपटात प्रियांशु चटर्जी, साक्षी शिवानंद व ओम पुरी यांनी अभिनय केला होता. हा चित्रपट पण एक लव स्टोरी होती. हा चित्रपट विदेशी फिल्म ‘फादर ऑफ द ब्राइड’चा रीमेक होता. २००५ मध्ये त्यांनी ‘दस’ हा चित्रपट बनवला. दिग्दर्शक म्हणून अनुभव सिन्हा यांच्या करियरची हा मोठा चित्रपट ठरला. हा मल्टीस्टारर चित्रपट असून यात संजय दत्त, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, इशा देओल, दीया मिर्जा व जाएद खान यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला.
या नंतर त्यांनी २००६ मध्ये त्यांनी ‘तथास्तु’ हा चित्रपट बनवला. अनुराग सिन्हा यांच्या या चित्रपटातही मुख्य भूमिका संजय दत्त यांची होती. हा चित्रपट अमेरिकी फिल्म जॉन क्यू की कहानी वर आधारित होता. २००७ मध्ये त्यांनी बनवलेला ‘कैश’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ते निर्माते झाले.तसेच त्यांनी याचे दिग्दर्शन केले होते.यात होते अजय देवगन, शमिता शेट्टी, दीया मिर्जा, सुनील शेट्टी व रितेश देशमुख. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्ण पणे फ्लॉप झाला. ‘कैश’ हा चित्रपट फ्लॉप झाल्याने अनुराग सिन्हा यांनी चार वर्षे कुठल्याही चित्रपटासाठी काम केले नाही, व या नंतर २०११ मध्ये आला अनुराग सिन्हा यांचा ‘रा वन’ चित्रपट. शाहरुख खान यांचा हा चित्रपट अनुराग सिन्हा यांचा सर्वात बिग बजेट चित्रपट ठरला. १५० कोटी हून अधिक बजेट मध्ये बनलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. २०१४ मध्ये अनुराग सिन्हा यांनी जूही चावला व माधुरी दीक्षित यांना घेऊन त्यांनी ‘गुलाब गॅग’ हा चित्रपट बनवला. याच वर्षी त्यांचा ‘जिद’ हा चित्रपट आला. अनुराग सिन्हा यांनी हा चित्रपट निर्माण केला व विवेक अग्निहोत्री याचे दिग्दर्शक होते. २००६ चा सीक्वल २०१६ ‘तुम बिन 2’ या नावाने त्यांनी बनवला. २०१८ मध्ये आलेला अनुराग सिन्हा यांचा ‘मुल्क’ हा चित्रपट बऱ्या पैकी चालला. या चित्रपटात ऋषि कपूर, तापसी पन्नू, मनोज पाहवा, रजत कपूर व प्रतीक बब्बर यांनी भूमिका केल्या होत्या. अनुभव सिन्हा यांनी एका सत्य घटनेवर आधारित असा हा विलक्षण प्रभावी, दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला आणि अभिनयाची कमाल उंची गाठणारा आजच्या काळातला सर्वाधिक महत्वाचा चित्रपट तयार केलेला होता. २०१९ मध्ये अनुराग सिन्हा यांचा ‘आर्टिकल 15’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
या चित्रपटात मुख्य भूमिका आयुष्मान खुरानाने केली आहे. हा चित्रपट १० व्या लंडन फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवला गेला होता. २०२० मध्ये अनुराग सिन्हा यांचा ‘थप्पड’ हा चित्रपट आला, या चित्रपटाची पटकथा आहे मराठ मोळी मृण्मयी लागू आणि अनुभव सिन्हा यांची. यातील मुख्य कलाकार आहेत तापसी पंन्नू, रत्ना पाठक. हा चित्रपट तुफान चालला.