अलिबाग

रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरूड आणि रोहा विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या विकासकामांसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची पूर्तता हे आमदार महेंद्र दळवी हे पूर्ण ताकतनिशी करतील असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या सेनेच्या माजी प्रतोद मानसी दळवी यांनी बोर्ली येथे पंचकृम समाजाच्या समाज मंदिर भूमिपूजन प्रसंगी केले.
यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख भरत बेलोसे,मुरूड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, जिल्हा संघटिका शुभांगी करडे,पंचकृर्म समाज अध्यक्ष प्रकाश शिंदे उर्फ पप्पू,उप तालुका प्रमुख भगीरथ पाटील,निलेश घाटवल,भारत मोती,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मानसी दळवी यांनी सांगितले की,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरित असलेले जन हिताचे निर्णय घेण्यासाठी वारंवार मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना सांगत होतो.मात्र त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे खोडा घालण्याचे काम करीत असत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी बाळासाहेबांचीच भूमिका घेऊन जात आहेत. तेच प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. पक्षप्रमुखांना याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमची भूमिका साहेबांपर्यंत पोहोचू दिलेली नाही
,रायगड चे आमदार महेंद्र दळवी,आमदार भरत गोगावले,आमदार आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांना जाणवत असणारी व्यथा वेळीवेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे मांडली होती. मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांनी योग्यवेळी आमदारांच्या नाराजीची दखल घेतली असती तर ही परिस्थिती ओढावलीच नसती. आम्ही आजही शिवसेनेत आहोत. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या, अशी विनंती पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. पण आमचे म्हणणे ऐकले गेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री दिला. त्यांच्याकडून शिवसेना आमदारांची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले गेले. विकास निधी दिला जात नव्हता.शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील मंजूर कामांचे श्रेयही राष्ट्रवादी काँग्रेस घेण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे सर्व आमदार आणि पदाधिकारी यांनी बैठक घेऊन पालकमंत्री हटावा म्हणून पुन्हा एकदा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्याकडेही दुर्लक्ष केले गेले. राज्यातील सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती होती. त्यामुळेच शिवसेना आमदारांवर उठाव करण्याची वेळ आली.
मतदारसंघात अडीच वर्षांत जी कामे राहून गेली ती आता आम्ही करून दाखवू. जे नाराज आहे त्यांचीही समजूत काढू.असेही मानसी दळवी यांनी सांगितले.
यावेळी पंचकृम समाजाचे कार्यकारिणी सदस्य आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.