मुरूड तालुका महिला आघाडी ऐन निवडणूकीच्या तोंडावर राजीनामा

0
34

जिल्हा महिला संघटिका दिपश्री पोटफोडे यांचा पक्षांतर्गत मनमानी कारभार

शिवसेनेच्या रायगड जिल्हा महिला संघटिका दिपश्री पोटफोडे यांच्या पक्षांतर्गत मनमानी कारभार करीत असल्याने मुरूड तालुका महिला आघाडी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे तालुका संघटिका शुभांगी करडे यांनी सांगितले.
मुरूड महिला आघाडी प्रमुख शुभांगी करडे यांनी सांगितले की,गेल्या काही महिन्यांपासून सेनेच्या महिला संघटिका दिपश्री पोटफोडे हे महिलांना पक्षांतर्गत असणाऱ्या तालुका पदाधिकारी यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेऊन लादण्याचा प्रयत्न करीत असतात.तसेच महिला पदाधिकारी यांना दुय्यम दर्जा देत पदाधिकारी यांच्या मानहाणीची संधी न सोडणे. वेळोवेळी पक्षाचे जेष्ठ नेतेमंडळी आली की पुढे पुढे करीत श्रेष्ठ कशा आहेत असे दाखवत असताना इतर पदाधिकारी महिला यांना तोंडावर पाडण्याचा मेहमीच प्रयत्न असतो.
दिपश्री पोटफोडे यांच्या मनमानी कारभार बाबत वरिष्ठ मंडळी यांच्या कडे सुद्धा तोंडी तक्रार करूनसुद्धा ते आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने माझ्यासाहित मुरूड तालुक्यातील महिलां पदाधिकारी लवकरच राजीनामा हा आमदार तथा जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांच्यासाहित इतर वरिष्ठ पदाधिकारी यांना सामूहिक रित्या देण्यात येणार आहे.

मुरूड तालुक्यातील महिला पदाधिकारी यांच्या नाराजीबाबत विचारणा करण्यासाठी दिपश्री पोटफोडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र होऊ शकला नाही.

दिपश्री पोटफोडे यांच्या संदर्भात वरीष्ठ पदाधिकारी यांनी लक्ष घालून दीपश्री पोटफोडे यांचा राजीनामा घेऊन आम्हाला न्याय द्यावा.अन्यथा आमचा सामूहिक राजीनामा स्वीकारावा :शुभांगी करडे.महिला संघटिका,मुरूड-रायगड