विठ्ठल रखुमाई देवस्थान होराळे- वावोशी येथे मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शत्रक्रीया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे मुख्य मार्गदर्शन रो. उमाताई मुंढे यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे शिबीर यशस्वी रित्या पार पडले. शिबिरात ९६ ओपीडी व १५ मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरासाठी आपटी गावच्या समाजसेविका श्वेता ताई मनवे, ह.भ.प.दिलीप पाटील व देवस्थानचे संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी रोटरी क्लब पाताळगंगाचे अध्यक्ष गणेश काळे, सेक्रेटरी संदिप साबळे, रो.शारदा काळे, रो. वर्षा पाटील, रो.बाळकृष्ण होनावळे, रो.शशिकांत शानभाग, रो.धनंजय गीध, अॅन. अनुराधा होनावळे, रोटरॅक्ट अध्यक्ष रोहन गावडे,सेक्रटरी समृद्ध उचिल व सुजित मोहनदास यांची उपस्थिती व मोलाचे सहकार्य लाभले.