आगामी सणानिमित्त खोपोली पोलिस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न..

खोपोली
सोमवार दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली व खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या निर्देशानुसार आगामी सण-उत्सवानिमित्ताने खोपोली पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी सदस्यांची बैठक संपन्न झाली.आगामी सण- उत्सव शांततेने शासनाच्या नियमाचे पालन करून साजरे करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या गेल्या.
खोपोली शहरात आजपासून येत्या चार दिवसात साजरे होणारे सर्व धर्मियांचे सण-उत्सव परंपरागत उत्साहात व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे व्हावेत या हेतुने खोपोली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीच्या प्रारंभी पो.निरीक्षक शिरीष पवार यांनी उपस्थितांचे स्वागत करतांना आगामी येणारे सण साजरा करीत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातुन गैरसमज होणार नाहीं याची काळजी घेताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यात सतर्कता असावा.एकोप्याने सण साजरे करून आनंद द्विगुणित करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पोलीस निरीक्षक शिरीष पवार, महावितरणचे सहा.अभियंता लक्ष्मीकांत गलांडे यांनी योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील,असे स्पष्ट केले. सहा.पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी खोपोली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक हरेश काळसेकर,पोलीस उपनिरीक्षक अलोक खिसमतराव,पो. ना.सतीश बांगर,महावितरणचे सहाय्यक अभियंता लक्ष्मीकांत गलांडे,मोहन औसरमल,कैलास गायकवाड,किशोर पानसरे,डॉ.सुनिल पाटील,दिलीप पोरवाल,डॉ.शेखर जांभळे,नरेंद्र हर्डीकर,रविंद्र रोकडे,दिलीप पुरी,संतोष देशमुख,दिनकर भुजबळ,अश्पाक लोगडे,रशिद शेख,मोहन केदार,मनोज माने,संदिप ओव्हाळ उपस्थित होते.