चौक,
महाराष्ट्राचा महाउत्सव चे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला उद्घाटन सोहळा रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक एन.चंद्रा उपस्थित होते.
जगप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या खालापूर तालुक्यातील एन. डी. स्टुडिओत त्यांचीच संकल्पना असलेला महाराष्ट्राचा महाउत्सव हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला,महाराष्ट्राची कला,संस्कृती, खाद्य संस्कृती, भजन,कीर्तन,याचबरोबर मैदानी खेळ, कला,याचबरोबर शेती पर्यटन,मत्सव्यवसाय,विविध कला यांनी समृद्ध असलेला,पारंपरिक कार्यक्रम आजपासून चार दिवस साजरा होणार आहे.
या महोत्सवाचे चे उद्घाटन पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास खासदार डॉ. अमोल कोल्हे,आमदार महेंद्र थोरवे,नितीन देसाई यांची आई,रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे,अभिनेत्री मानसी नाईक,श्वेता शिंदे,उद्योगपती सुधीरशेठ ठोंबरे,शेती, मत्सव्यवसाय यातील उद्योजक, शिरीष पारकर यांच्यासह चित्रपट,कला,उद्योग क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.यावेळी अनेक कला,ऐतिहासिक महत्त्व जाणणारे यांनी महोत्सवाला भेट दिली.
विविध प्रकारचे शेती उत्पादन, खाद्यपदार्थ, कला,पेंटिंग, मत्सव्यवसाय यांची दालने तयार करण्यात आली आहेत.