खोपोली । भारतीय जनता पार्टी पक्ष देशात एक नंबरचा पक्ष असल्याने पुढील काळात पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत राहत तळागाळापर्यंत भाजप च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पोहचावे, यासाठी भाजपाने सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात केली.
खालापूर तालुक्यात भाजपा खालापूर पूर्व मंडळाचे अध्यक्ष सनी यादव यांच्या नेतृत्वाखाली उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याने भाजपच्या पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून ही सदस्य मोहीम खलापुर पोलीस ठाण्यासमोरील ठिकाणाहून करण्यात आली.याप्रसंगी भाजपचे उपजिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे, खालापूर तालुका पूर्व तालुका अध्यक्ष सनी यादव, युवामोर्चाविधानसभा संयोजक प्रसाद पाटील, खालापूर तालुका सरचिटणीस रविंद्र पाटील, आदी प्रमुखासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खालापूर शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून याठिकाणी सर्वच शासकीय कार्यालय असल्याने येथेतालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसह अनेकांची याठिकाणी मोठी रेलचेल पाहायला मिळत असताना भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या भाजप सदस्य नोंदणी मोहिमेला सर्वसामान्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आपली सदस्य नोंदणी करून घेतल्याचे ३ जानेवारी रोजी पहायला मिळाले.