बीईंग गुड फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती वैजयंती ठाकूर आणि उपाध्यक्ष तुषार ठाकूर तसेच फाऊंडेशनचे सदस्य महेंद्र ठाकूर ,सदस्य प्रमोद जांभळे, भानूदास पाटील यांच्याहस्ते शिवनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले .

यावेळी फाउंडेशनच्या चेअरमन वैजयंती तुषार ठाकूर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की , जिल्हा परिषद शाळेतील आदीवासी विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन.हे विद्यार्थी शिकून मोठे व्हावेत, चांगल्या हुद्द्यावर जावेत यासाठी त्यांना शिक्षण घेत असताना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास बिईंग वूड फाउंडेशनच्या वतीने मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असे त्या म्हणाल्या.
यावेळी बिईंग गुड फाउंडेशनच्या वतीने शिवनगरसह रसायनी पाताळगंगा परिसरातील जिल्हा परिषद शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या व दफ्तरांचे वाटप सुरू केले आहे.
याअगोदर वासांबे मोहोपाडा,चांभार्ली,तुराडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे.यावेळी बिईंग गुड फाउंडेशनच्या चेअरमन वैजयंती तुषार ठाकूर, उपाध्यक्ष तुषार ठाकूर,प्रमोद हरिभाऊ जांभळे,शालेय मुख्याध्यापिका रंजना विनायक गायकवाड,शिक्षिक मंदार पदमाकर वेदक आदीसह विद्यार्थी व शालेय शिक्षक उपस्थित होते.