दिघोडे गावात विद्या सुरेश पाटील यांच्या साक्षी ब्रायडल स्टुडिओ चे मोठ्या थाटात् उद्घघाटन करण्यात आले. मेकअप आर्टिस पूनम भोईर आणि ब्युटी थेरपिस्ट वरदा मोरे यांच्या हस्ते झाले.
सदर उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून दिघोडे गावच्या विद्यमान सरपंच सोनिया मयूर घरत , माजी उपसरपंच प्रफुल पाटील , सौ. शारदा कासकर, उपसरपंच सौ. पूजा पाटील ,सौ. कविता म्हात्रे. चिरले ग्रुप ग्रामपंचायत दीपक मढवी ,सदस्य चिरले ग्रामपंचायत प्रतीक्षा निलेश पाटील,प्रणाली मढवी,कला सागर चे श्रीकांत मुंबईकर,जांभूळ पाडा गावचे समाजसेवक प्रभाकर पाटील, दिपक मढवी. सहज सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, इशिका शेलार, योगिता जांभळे, प्राद्यापक मृणाल मॅडम, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी पूनम भोईर,आणि वरदा मोरे यांनी विद्या पाटील ह्यांना पुढच्या भविष्यासाठी शुभेच्या देताना म्हणाले कि सद्याच्या काळात मेकअप ची मोठी क्रेझ आहे.त्यामुळे पार्लर च्या व्यवसायाला मोठा वाव आहे.येथे मेकअप कोर्स साठी विद्या पाटील यांनी उत्कृष्ट अरेंजमेंट केली आहे. साक्षी ब्रायडल स्टुडियो हा शहरातल्या स्टुडिओंना लाजवेल अशा प्रकारे सिस्टिमेटीक पद्धतीने सादर केला आहे.विद्या पाटील यांनी ब्रायडल मेकअप क्लासेस सुरु केले आहेत., ज्यामुळे तेथील महिलांना पार्लर व्यवसाय करण्यास चालना मिळेल.





















