बीईंग गुड फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती वैजयंती ठाकूर आणि उपाध्यक्ष तुषार ठाकूर तसेच फाऊंडेशनचे सदस्य महेंद्र ठाकूर ,सदस्य प्रमोद जांभळे, भानूदास पाटील यांच्याहस्ते चांभार्ली जिल्हा परिषद शाळेतील चाळीस विद्यार्थ्यांना छत्र्या आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले . यावेळी फाउंडेशनच्या चेअरमन वैजयंती तुषार ठाकूर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ,परिस्थिती किती ही आडवी आली, तरी शिक्षण हे परिस्थिती वर मात करून घ्यायला पाहिजे.तुम्ही उद्याचे या देशाचे आधारस्तंभ आहात असे त्या म्हणाल्या.यावेळी आसपासच्या परिसरात फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपणही करण्यात आले.बिईंग गुड फाउंडेशनच्या वतीने रसायनी पाताळगंगा परिसरातील जिल्हा परिषद शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या व दफ्तरांचे वाटप सुरू केले आहे.याअगोदर वासांबे मोहोपाडा,तुराडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे.यावेळी बिईंग गुड फाउंडेशनच्या चेअरमन वैजयंती तुषार ठाकूर, उपाध्यक्ष तुषार ठाकूर,सरपंच बाळी कातकरी, उपसरपंच चित्रा महेंद्र मुंढे ,प्रमोद हरिभाऊ जांभळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण हरिभाऊ जांभळे,माजी उपसरपंच प्रतिप शंकर पाटील,महिन्द्र मुंढे, शालेय मुख्याध्यापिका मेघना शंकर झिराडकर,उपशिक्षिका स्मिता ईंश्वर पाटील, अंगणवाडी सेविका ताराबाई बाळू जांभळे, अंगणवाडी मदतनीस शामल भंधुराज जांभळे आदीसह विद्यार्थी व शालेय शिक्षक उपस्थित होते.