जन्म.२९ एप्रिल १९४६ गिरगाव येथे.
प्रदीप नाटेकर यांचे गायनाचे प्राथमिक शिक्षण ग्वाल्हेर घराण्याचे पं. राजाराम पराडकर
यांच्याकडे झाले. पंडित प्रदीप नाटेकर हे रामभाऊ मराठे यांचे जावई होत. प्रदीप नाटेकर हे रामभाऊ मराठे यांचे पट्टशिष्यच! प्रदीप नाटेकरांना रामभाऊंचा भरपूर सहवास लाभला. कारण सुरुवातीपासूनच गुरूसोबत तंबोरा घेऊन बसायची संधी त्यांना मिळाली. त्यांच्याकडून जयपूर घराज्याच्या गायकीची नालीम मिळाली. त्यांच्या सहवासात शास्त्रीय, उप-शास्त्रीय, नाट्य संगीत, अभंग रसिकांसमोर कसे सादर करावे याचे शिक्षण मिळाले. पंडित प्रदीप नाटेकर यांनी पं.मधुकर बुवा जोशी यांच्याकडे ही गायनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. या सोबतच त्यांनी तबल्याचे शिक्षण वडिल श्रीपाद नाटेकर व श्रीधर पाध्ये यांच्याकडून घेतले.आकाशवाणी वरील ते मान्यता प्राप्त गायक असून ते गुरुकुल पध्दतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. या सोबतच मुंबई विद्यापीठात त्यांनी अनेक विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांना जास्त वेळ मार्गदर्शन करता यावे यासाठी त्यांनी माजगाव डॉक मधून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या दोन ध्वनीफिती उपलब्ध आहेत. त्यांनी सौभद, जय जय गौरीशंकर, होनाजी बाळा, पंडितराव जगन्नाथ,
गीत गाती ज्ञानेश्वर या नाटकात मुख्य भूमिका केल्या आहेत. यातील भूमिकाच्यासाठी उत्कृष्ट
त्यांना रौप्यपदक प्राप्त झाले. प्रदीप नाटेकर यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा कलाकार पुरस्कार पुणे यांचा मिळाला आहे. प्रदीप नाटेकर यांनी संगीत सम्राट या साहेब अल्लादिघावाँ समारोह, बाळकृष्णबुवा संगीत साधना मंडल, इचलकरंजी, भारत गायन समाज पुणे, सवाई गंधर्व पुण्यतिथी, दादर माटुंगा कल्चरल सेंटर, जगन्नाथबुवा पुरोस्ति जन्मशताब्दी समारोह ,सातारा, पं. राम मराठे स्मृती समारोह ठाणे, ब्राम्हण सभा गिरगाव अशा अनेक मैफिली केल्या आहेत. पं.प्रदीप नाटेकर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..