खोपोली –

खोपोली नगरपरिषदेत स्व.सखाराम गेणू जाधव सलग तीन वेळा निवडून येत उपनगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी नगरपरिषद हद्दीत अनेक विकासकामे केली आहेत तसेच सुभाष नगर तसेच खोपोलीच्या जडण घडणेत जाधव मामांचा सर्वात मोठा वाटा असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुभाष नगर रस्त्याला स्व.सखाराम जाधव यांचे नाव द्या तसेच या परिसर सुशोभीकरण करण्याची  ग्रामस्थांच्या मागणीचा विचार तातडीने व्हावा असे निवेदन पत्र शुक्रवार दि.५ ऑगस्ट रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अनुप दुरे यांना देण्यात आले आहे.

पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अनुप दुरे यांना निवेदन देण्यासाठी खोपोली भाजपचा वतीने युवा नेते व सुभाष नगरचे प्रमुख ग्रामस्थ राहुल जाधव , महिला मोर्चा शहर अध्यक्षा शोभाताई काटे, चिटणीस गोपाळ बावस्कर, वैद्यकीय सेलचे सह संयोजक विकास खुरपुढे, सागर काटे यांनी दिले या वेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सुभाष नगर मधील ग्रामस्थ येथील ५० वर्ष जुन्या रेल्वे गेट- मस्को गेट ते सुभाष नगर रस्त्यास खोपोली नागरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम गेणू जाधव मार्ग व त्यांचा घरा समोरील चौकस जाधव मामा चौक नामकरणाची मागणी नागरपरिषदेकडे गेले अनेक वर्ष करीत आहेत.दि.१० फेब्रुवारी रोजी आजी,माजी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन या नामकरण मागणीचे समर्थन करत तसे पत्र दिले होते.

ग्रामस्थांचा या मागणीची दखल घेत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत  ठाकूर यांनी पत्र पालिकेचे  मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांना दिले आहॆ.