जयऋतूकमल हॉस्पिटल यांचा पुढाकार..

दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी जयऋतूकमल हॉस्पिटल ते पाटणकर, चौक, काटरंग, बाजारपेठ, खालची खोपोली व पुन्हा जयऋतूकमल हॉस्पिटल शास्त्रीनगर येथे जागरूकता फेरी काढण्यात आली.

डॉ. श्रीकांत पाटील व डॉ. ज्योति पाटील यांच्या नेतृत्वाखाली
या रॅलीत डॉक्टर्स,सामाजिक संस्था, व्यावसायिक व नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.
जागतिक डायबिटीस दिनानिमित्त जयऋतू कमल हॉस्पिटल आणि आय.सी.यू. व आबासाहेब व ता. पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी मोफत डायबेटीस तपासणी शिबिर सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 ते 2 या दरम्यान जय ऋतुकमल हॉस्पिटल शास्त्रीनगर खोपोली येथे होणार आहे.