३० मे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा जन्मदिन.
जन्म.३० मे १९४०
जगमोहन दालमिया यांचे जन्म कोलकाता येथे मारवाडी कुटुंबात झाला. दालमिया यांचे शिक्षण कोलकाता येथल स्कोटीश चर्च महाविद्यालयात झाले. याच दरम्यान ते क्रिकेट खेळू लागले. ते विकेटकीपर म्हणून खेळताना त्यांनी दुहेरी शतक केले होते. पुढे ते आपल्या वडिलाच्या एम एल डालमिया कंपनी काम करू लागले.
जगमोहन दालमिया यांचा दांडगा लोकसंपर्क, पदांसाठी केल्या जाणाऱ्या राजकारणाची उत्तम जाण, पेच-प्रतिपेच लढवण्याचे बुद्धिकौशल्य आणि आर्थिक पाठबळ या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. या शिदोरीच्या जोरावर त्यांनी स्वतःचा जम क्रिकेट प्रशासनात बसवलाच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यातून क्रिकेटचा विस्तारही होत गेला. भारताच्या दृष्टीनेही त्यांची कारकीर्द लाभदायी ठरली. वयाच्या ३९व्या वर्षी ते बीसीसीआयमध्ये दाखल झाले तेव्हा ही संघटना तशी दुबळीच होती. गावसकर, विश्वनाथ, वेंगसरकर, कपिलदेव असे खेळाडू असले तरी एकंदर संघाची कामगिरीही फार काही लक्षणीय नव्हती. अशा काळात १९८३ च्या प्रुडेन्शियल विश्वचषक स्पध्रेत कपिलदेवच्या संघाने वेस्ट इंडिजला हरवले व भारतीय क्रिकेटचा जणू भाग्योदय झाला. भारतात एकदिवसीय क्रिकेटचा पंथ रुजला. बीसीसीआयच्या अर्थकारणाने त्यानंतर अशी काही उसळी घेतली की आज ती जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. पण याला आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरली होती- बीसीसीआयचे तेव्हाचे अध्यक्ष एनकेपी साळवे यांचा लॉर्डसमधील मेरिलबोन क्रिकेट क्लबने केलेला अपमान. अवघ्या दोन प्रवेशपत्रिका देण्यास त्यांनी दिलेला नकार साळवे यांना झोंबला. क्रिकेटची आíथक राजधानी भारतात आणण्याचा चंग त्यांनी बांधला. ती कामगिरी त्यांनी सोपविली ती दालमिया व आय एस िबद्रा यांच्याकडे. त्यांचे पहिले लक्ष्य होते भारतात विश्वचषक स्पर्धा आणण्याचे. त्यासाठी त्यांनी पाकिस्तान आणि श्रीलंकेची मदत घेतली. १९८७ च्या विश्वचषकासाठी इंग्लंडची बोली ४ हजार पौंडांची होती. यांनी २० हजार पौंड देऊन स्पर्धा भारतात आणली. प्रायोजक होते धीरुभाई अंबानी. दालमिया आणि िबद्रा यांनी त्या वेळी आणखी एक खेळी केली. दूरचित्रवाणी प्रक्षेपणातील दूरदर्शनची एकाधिकारशाही मोडून काढत हे क्षेत्र खुले करून बीसीसीआयकडे पशांचा ओघ वळवला. पुढे धनाढय़ प्रायोजक या खेळावर फिदा झाले (ती हाव आयपीएलपर्यंत वाढत गेली). त्यातून क्रिकेटचे अंतिमत: किती भले झाले हा वादाचा विषय. त्यासाठी दालमिया यांची कोणी कितीही िनदा केली तरी अनेक क्रिकेटपटू मात्र दालमियांचे ऋणी आहेत. त्यांच्यासाठी ते ‘जग्गूदादा’होते. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळखला जायचा. आपल्या गोलंदाजीची विशेष शैली आणि विकेट मिळवल्यानंतर मैदानातलं सेलिब्रेशन यासाठी शोएबची खास ओळख होती. मात्र अनेकदा त्याच्या शैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. २०००-२००१ च्या दरम्यान आयसीसीने शोएबच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेत त्याच्यावर बंदी घालण्याच्या तयारीत होतं. मात्र माजी बीसीसीआय प्रमुख आण तत्कालीन आयसीसी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी मध्यस्थी केल्यामुळे शोएबची कारकिर्द वाचली होती. जगमोहन त्यावेळी आयसीसी अध्यक्ष होते, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या शब्दाला बराच मान होता. मात्र शोएब अख्तरच्या गोलंदाजी शैलीच्या प्रकरणात दालमियांनी आम्हाला पाठींबा दिला. अनेक आयसीसी सदस्य शोएबच्या विरोधात होते, तरीही दालमिया आपल्या मतावर ठाम राहिले. यानंतर आयसीसीने शोएबच्या गोलंदाजी शैलीला मान्यता देऊन त्याला खेळण्याची परवानगी दिली.
जगमोहन दालमिया यांचे २० सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.