खोपोली..
दिपक ब्रदर्स सामजिक प्रतिष्ठान खोपोली यांच्या वतीने दिनांक 7ऑगस्ट 2022 रोजी दिवंगत दिपक गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षाप्रमाणे शहरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सारनाथ बुध्दविहार भानवज येथे रायगड हाँस्पिटल, दीपक ब्रदर्स व मनोहर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले यावेळी बहुसंख्य नागरिक व महिलांंनी आरोग्य तपासणी केली.
खोपोली शहरात सामाजिक काम करणारी दिपक ब्रदर्स प्रतिष्ठान संघटना असून दरवर्षी दिवंगत दिपक गायकवाड यांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्ताने मोफत आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मा.नगराध्यक्ष डॉ. सुनिल पाटील, मा.नगरसेवक तुकाराम साबळे,किशोर पानसरे,अरूण पुरी,राजू गायकवाड,सुर्यकांत देशमुख,
आर.पी.आय.चे युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड,शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस किशोर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष अंकीत साखरे,उपाध्यक्ष शेखर पिंगळे,भूषण पाटील,सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड,देविदास पाटील, शिवसेनेचे नेते एकनाथ पिंगळे,मनेसेचे जिल्हा उपाध्यक्ष जे.पी.पाटील,तालुकाध्यक्ष सचिन कर्णूक,आरपीआयचे शहर अध्यक्ष चिंतामणी गायकवाड,वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष दिपक गायकवाड, काँग्रेस शहर अध्यक्ष रिचर्ड जाँन,महिला शहर अध्यक्षा रेखा जाधव,भाजपचे हेमंत नांदे,सहजसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दि.दिपक गायकवाड यांना श्रध्दांजली अर्पण केली.
सदर आरोग्य शिबीरात विवीध प्रकारच्या आरोग्य तपासणी तसेच नेत्र तपासणी निःशुल्क करण्यात आल्या. या आरोग्य शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला.
आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजक विकी गायकवाड,कैलास गायकवाड,रविंद्र रोकडे,प्रशांत मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली दिपक ब्रदर्स आणि मनोहर मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.
दिवंगत दिपक गायकवाड हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते.त्यांच्या अपघाती निधनानंतर आठवणींना उजाळा देण्यासाठी गेल्या दहा वर्षापासून आरोग्य शिबीर,वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम आयोजित करत असतो.आरोग्य शिबीराच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळत असते असे प्रतिपादन कैलास गायकवाड यांनी केले.