रसायनी
गुरुपौर्णिमा – व्यासपौर्णिमा मोठ्या उत्साहात विद्याप्रसारणी सभा चौक संचलित यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाशजी देशमुख यांनी गणेश पूजन तर संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा यांनी सरस्वतीपूजन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे उपाध्यक्ष अविनाशजी देशमुख यांनी गुरुची महती विषद केली. तर गुरुचे वर्तमानकालीन महत्त्व संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र भाई शहा यांनी लक्षात आणून दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका पुजारी मॅडम यांनी केले. शिक्षकांतर्फे कल्पना देशमुख मॅडम आणि निखिलेश देशमुख सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य भोमले सर, उपप्राचार्य पुजारी मॅडम, पर्यवेक्षक मुळीक सर कॉलेजचे प्राध्यापक कल्पना देशमुख मॅडम,मोहन सावंत सर, अमोल वाघमारे सर, दिपाली बारणीस मॅडम, निखिलेश देशमुख सर, शरद कुंभार सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
कु.अफसाना शहा आणि कु. शुभम माने यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु. पूजा कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण तथा फलक लेखन संजय कांबळे यांनी केले.
दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिरात इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व वर्गांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.