रसायनी पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांच्या वतीने गुरुवार दि.28 रोजी दुपारी पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत एकूण 70 लाभार्थ्यांना 18 लाख 62 हजार 280 अनुदान वाटप करण्यात आले.सदर अनुदान दिव्यांग लाभार्थी व बचत गटांना मिळाल्याने ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग नागरिकांत समाधानाचे वातावरण दिसून आले.सरपंच गौरी गडगे, बिर्ला कंपनीचे एच आर मॅनेजर प्रकाश देसाई यांच्याहस्ते हे अनुदान वडगाव ग्रामपंचायत कार्यालयात वाटप करण्यात आले.यावेळी बिर्ला कंपनीचे रावत साहेब, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महादेव गडगे,हरिष पाटील आदी उपस्थित होते.दिव्यांग बांधवांना पाच टक्के दिव्यांग निधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.