२९ जून गेल्या शतकाच्या उत्तरार्धातला संशोधनपूर्वक कादंबऱ्या लिहिणारा एक यशस्वी कादंबरीकार अर्विंग ,वॉलेस यांचा स्मृतिदिन.
जन्म.१९ मार्च १९१६ रोजी इलिनॉयस अमेरिका येथे.
आपल्या ३३ कादंबऱ्यांचा १२ कोटींवर खप असलेल्या, ३१हून अधिक भाषांमध्ये भाषांतरं आणि ६० कोटींवर चाहते लाभलेल्या अर्विंग वॉलेस यांच्या बहुतेक सर्वच कादंबऱ्या कायमच बेस्टसेलर ठरल्या होत्या. त्यांनी किशोर वयातच मासिकांतून कथा लिहायला सुरुवात केली होती. पुढे त्यांनी हॉलीवूडमध्ये मोर्चा वळवला आणि तो पटकथाकार बनला. पण तिथे मन न रमल्याने ते कादंबरी लेखनाकडे वळले आणि द चॅपमन रिपोर्ट या तुफानी खपाच्या कादंबरीनंतर त्यांनी पूर्णवेळ कादंबरी-लेखनाकडे लक्ष केंद्रित केलं आणि जवळपास ३३ कादंबऱ्या लिहिल्या ज्यांची ३१हून अधिक भाषांमध्ये भाषांतरं झाली. एका प्लॅननुसार रशियाची केजीबी ही संघटना अमेरिकेच्या अध्यक्ष्यांच्या पत्नीचं अपहरण करून तिच्या जागी तिच्यासारख्याच दिसणाऱ्या आपल्या एका गुप्तहेर स्त्रीला थेट व्हाईट हाउसमध्ये पाठवून देतात आणि पुढे काय विलक्षण घटना घडतात ते सांगणारी त्याची ‘द सेकंड लेडी’ ही कादंबरी विशेष गाजली. त्यावर शरारा नावाचा हिंदी सिनेमाही आला होता. पांढरपेशी आणि उच्चभ्रू मनोवृत्ती, त्यांच्या धारदार भावना, प्रेम, प्रणय, गूढ रहस्य, स्वैराचार असे विषय त्याच्या कादंबऱ्यांतून डोकावत असत.
द चॅपमन रिपोर्ट, द प्राईझ, द थ्री सायरेन्स, द मॅन, द प्लॉट, द सेव्हन मिनिट्स, द निम्फो अॅन्ड अदर मॅनीअॅक्स, द वर्ड, द फॅन क्लब, द पिजन प्रोजेक्ट, द सेकंड लेडी, द ऑलमाइटी, द मिरॅकल, द सेवन्थ सिक्रेट, द सेलेस्टीअल बेड, द गेस्ट ऑफ ऑनर – अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. अर्विंग वॉलेस यांचे २९ जून १९९० रोजी निधन झाले.