माथेरान-संतोष खाडे
माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ एप्रिल रोजी माथेरान शिवसेना शाखेच्या वतीने सर्व शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.तसेच माजी नगरसेवक संदिप शिंदे यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले.
माथेरान मधील दानशूर व्यक्तिमत्व,सर्व सामान्यांच्या गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लॉक डाऊन काळात माथेरान वासीयांना आधार देणारे,गरजवंतांना,निराधार विधवा महिलांना पेंशन योजनेद्वारे मदत करणारे माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा व प्राचार्य शांताराम गव्हाणकर हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना शिवसेना शाखेच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक संदिप शिंदे यांच्या तर्फे या शाळेंमधील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे(लाडू) वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील सर्व शिक्षक वृंद तसेच माथेरान शिवसेना उपशहर प्रमुख प्रमोद नायक,सचिव योगेश जाधव,जेष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर बागडे,माजी नगरसेवक प्रकाश सुतार,महिला संघटिका संगीता जांभळे,माजी नगरसेविका कीर्ती मोरे, शलाका शेलार,सुहासिनी शिंदे,अर्चना बिरामणे,श्रुतिका दाभेकर, निधी जाधव,जयश्री कदम,रवी बिरामणे,सुधीर जाधव युवा सेनेचे गौरांग वाघेला, निखिल शिंदे,अंकिता तोरणे,शैलेश वाघेला,शैलेश शेलार,नंदकिशोर धनावडे,नरेश परदेशी,वैभव परब,चैतन्य शिंदे,दिनेश कदम, तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.