रोटरी क्लब पाताळगंगा व आर झुनझुनवाला शंकरा हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

0
41

 

प्राथमिक आरोग्य केंद्र, लोहोप येथे आयोजित करण्यात आले. शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. रोटेरीयन उमाताई मुंढे, अध्यक्ष गणेश काळे, प्राथमिक आरोग्य केंद्र वरिष्ठ डॉ. सीमा पाईकराव,ईसांबे ग्रामपंचायतीचे उप सरपंच अनंता पाटील, सेक्रेटरी संदिप साबळे, डॉ. पाटील यांनी दिप प्रज्वलित करुन शिबिराची सुरुवात केली.ओपीडी 78 तर मोतीबिंदू शस्त्रक्रिये साठी १७ पेशंट हाॅस्पिटल ला पाठविण्यात आले.रायगड जिल्हा परिषदेतून सन्मतीपत्र आणून शिबिराच्या सुरवाती पासून ते शेवट पर्यंत थांबून शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य रो. उमाताई मुंढे यांचे लाभले.

माजी सरपंच बबन पाटील, वडगाव ग्रामपंचायतीचे श्री नंदू पाटील रो. शारदा काळे,रो.वर्षा पाटील,रो. धनंजय गीध, सहा. सेक्रेटरी देवेंद्र महिंद्रकर रो.कल्पेश गीत, रो. सुनील कूरुप, रो. बाळकृष्ण होनावळे, अॅन. अनुराधा होनावळे,अॅनेट मनस्यू कुरुप,रो.अमित शाह,रोटरॅक्ट अध्यक्ष रो. रोहन गावडे,रो.अनिल सैनी, शंकरा हाॅस्पिटल
स्टाफ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वरीष्ठ डॉ.रोकडे सर्व नर्स व स्टाफ, आशा वर्कर्स यांची उपस्थिती लाभली.