भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सवानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत वडगावच्या माध्यमातून इंदेमित्सू ल्युबर्रीकांट इंडिया प्रा. लि. व येरळा प्रोजेक्टस् सोसायटी सांगली लि. यांचे सी.एस.आर निधीतून पेहचान प्रोजेक्ट मार्फत रसायनी पाताळगंगा परिसरातील गरीब ,गरजू गरोदर माता व स्तनदा माता यांना ग्रामपंचायत कार्यालय वाशिवली येथे वॉटर फिल्टरचे वाटप करण्यात आले.तसेच प्लास्टिक बंदीच्या आदेशाचे पालन करण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटपही करण्यात आले.यावेळी परीसरातील पन्नास पेक्षा जास्त महिलांनी उपस्थिती दाखवून वाॅटर फिल्टर वाटपाचा मोफत लाभ घेतला.याप्रसंगी इंदेमित्सु या कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक भूषण दामले, येरळा प्रोजेक्ट सोसायटीचे प्रकल्प समन्वयक देवदास झेंडे सरपंच गौरी महादेव गडगे, ग्रा.पं. सदस्य महादेव गडगे, राजेश पाटील, शिवाजी शिंदे, संदेश मालकर, योगिता भोईर, माजी उपसरपंच सुनील बडेकर, एकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.