अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे मयुरेश प्रवीण नागावकर(वय 25वर्षे,रा.रेवदंडा बाजारपेठ ता.अलिबाग,जि-रायगड) याने फसवणूक केली असल्याची तक्रार भूषण दत्तात्रेय घरत (वय 34 वर्षे,व्यवसाय- रियल इस्टेट डेव्हलपिंग राहणार:- रामेश्वर मंदिर शेजारी जोशी आळी चौल ता.अलिबाग,जि-रायगड)यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबतचे वृत्त असे की,रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील रेवदंडा बाजारपेठ येथे राहणारा मयुरेश प्रवीण नागावकर याने 20नोव्हेंबर2021 ते दि. 31डिसेंबर2021 दरम्यान फिर्यादी भूषण दत्तात्रेय घरत
यांना मुथुत फायनान्स बाबतची माहिती पठवुन सांगुन मुथुत फायनान्स मध्ये सोन्याचा लिलाव आहे याबाबत माहिती देवुन सोन्याचा लिलाव घेतल्यास तुम्हाला चांगल्याप्रकारे फायदा होईल तुम्ही जेवढी रक्कम गुंतवाल तेवढा तुमचाच 15 दिवसात फायदा होईल 15 दिवसात तुमची मुददल व फायदयाची रक्कम मिळणार आहे असे सांगुन फिर्यादी व साक्षीदार यांचे कडुन 90 लाख 44 हजार रुपयाच्या रक्कमा रोखीने व बॅकेव्दारे स्विकारुन सदरची मुददल रक्कम व फायदयाची रक्कम आजपर्यंत न देता फियादी व साक्षीदार यांची आर्थिक फसवणूक केली.
याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.70/2022 भा.दं.वि.क.420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सीताराम थोरात करीत आहेत.

या प्रकरणात आरोपी यांना वाचविण्यासाठी रेवदंडा येथील काही सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पाठराखण होत असल्याची चर्चा रेवदंडा सहित रेवदंडा चौल विभागात रंगली आहे.