पुणे…
पोलीस मित्र परिवार समाजातील गरजू घटकांची गरज ओळखून प्रभावी कार्य करीत असते. वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी समाजातील वेगवेगळे घटक सोबत असावेत ही काळाची गरज आहे. संघटना वाढ व संघटनेचे कार्य तळागाळात जावे या उद्देश्याने दिनांक 24 सप्टेंबर 2022 रोजी पुणे येथे पोलीस मित्र परीवार संघाची मिटींग संपन्न झाली.या मिटींगमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील व पुणे जिल्ह्यातील 26 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य अध्यक्षा माधुरी गुजराथी,सुभाष सोळंके,श्रीमंत सावंत,अँड.ज्योती विरकर, पद्मा शेळके,प्रिती मेहेत्रे,लिना परदेशी,मनिषा मुठेकर,ज्योती वऱ्हाडी उपस्थित होते
यावेळी या कार्यक्रमास येणे शक्य नसलेल्या पदाधिकारी यांना ऑनलाईन संपर्क केला असता सर्व पदाधिकारी यांनी आपापली जबाबदारी समजून घेवुन सदर कार्य जोमाने करण्याचे आश्वासन दिले. उपस्थित पदाधिकारी यांनी
पोलीस मित्र परीवार संघाची शपथ घेतली.