जन्म. १७ जुलै १९२७ केरळातील एर्नाकुलम जिल्ह्यातील कोळिकोड येथे.
कोझीकोड येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अन्ना यांनी मद्रास विश्विद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. डॉक्टर वा प्राध्यापक होणे शक्य असतानाही त्यांनी नागरी सेवेची परीक्षा दिली. त्या वेळी आयोगाच्या अनेक सदस्यांनी महिलांसाठी परराष्ट्र सेवा योग्य राहील असा सल्ला दिला, पण त्यांनी तो जुमानला नाही. मग भारतीय प्रशासकीय सेवेत १९५१ साली त्या दाखल झाल्या. सेवेसाठी त्यांना मद्रास केडरच देण्यात आले. तेव्हा मुख्यमंत्री राजाजी, कायदा व सुव्यवस्थेसारखे विषय महिला सक्षमपणे हाताळू शकणार नाहीत, असे म्हणाले होते. नंतर मात्र राजाजी यांनी जाहीर सभेत अॅहना राजम यांच्या कामाचे व सचोटीचे कौतुक केले होते.
मद्रासमधील सात मुख्यमंत्र्यांच्या काळात त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असताना १९८२ मध्ये दिल्ली एशियाडच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्याच बॅचचे अधिकारी रा. ना. मल्होत्रा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मल्होत्रा हे रिझव्‌र्ह बँकेचे गव्हर्नर बनल्याने अॅकना यांनाही महाराष्ट्रात येण्याची संधी मिळाली. सरकारने न्हावाशेवा येथे अद्ययावत बंदर उभारणीचे महत्त्वाचे काम त्यांच्यावर सोपवले. भूसंपादन ते केंद्राकडून पर्यावरणविषयक मंजुऱ्या मिळवणे हे मोठे जिकिरीचे काम होते. कोणत्याही प्रकारची कटुता येऊ न देता सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन हे काम त्यांनी पूर्ण केले. जेएनपीटीच्या आजच्या स्वरूपाचे श्रेय बरेचसे त्यांचेच. सरकारी सेवेतील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी होत. १९८९ मधे भारत सरकाने अन्ना राजम मल्होत्रा यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. अन्ना राजम मल्होत्रा यांचे १७ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले.