खोपोली

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोली शहर वंचितच्या वतीने भव्य सभासद नोंदणी अणि पक्ष प्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्सहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे अणि महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तसेच रायगड जिल्हा प्रभारी प्रियादर्शी तेलंग यांनी यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शहर अध्यक्ष दिपक गायकवाड यांच्या नेतृत्वात येणारी नगरपरिषद निवडणूक लढविणार असून पक्ष ताकदीने खोपोलीच्या बाजूने उभा असेल असा सुतावास मान्यवरानी केला तसेच स्वबळावर सर्वच जागा लढविण्याच्या उद्देशाने बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सभासद नोंदणीचा आरंभ करीत संपूर्ण खोपोलीत वंचितचे जास्तीत जास्त सभासद करण्याचा संकल्प करण्यात आला.एका आठवड्यात 712 सभासद नोंदणी करण्यात आली असून बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यपाणालीवर विश्वास ठेऊन मान्यवराच्या उपस्थित प्रभाग क्र. 3 मधील सामाजिक कार्यकर्ते आजेश अगवणे अणि त्यांच्या पत्नी अपर्णा अगवणे(गुरव) यांनी त्यांच्या मित्र परिवारासहित पक्ष प्रवेश केला यावेळी प्रदेश पदाधिकारी अणि शहर अध्यक्ष यांनी त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रम शहर अध्यक्ष दिपक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे अणि प्रदेश प्रवक्ते प्रियादर्शी तेलंग तसेच शहर महासचिव अशीष मणेर,सुमित जाधव,रोहित वाघमारे,कुणाल पवार, सुमित साळुंखे,रत्नदीप कांबळे, ऋषिकेश जगताप,तुषार अंकुश,नयन गायकवाड,प्रफुल पवार,संकेत साळुंखे,विजय सताने,भा.बौ. म. स. शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड,बंडू कदम,भगवान खंडागळे, दिपक खाडे, उत्तम पवार, टिपन्ना अरमार, कुंदन मोरे, गणेश बनसोडे,राजेश गायकवाड, अमित सताने,सुभाष ओव्हाळ, अमोल गोरी,अन्वर शेख,पप्पू साबळे, विशाल जाधव, प्रमिला गायकवाड, हरी कदम, प्रकाश गायकवाड,भारत गायकवाड, जेष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ,रमाताई मोरे,लताताई कदम, अश्विनी गायकवाड, श्रुती वाघमारे,यांच्या सह वंचित आणि भारतीय बौद्धमहासभा खोपोली शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.