धोकवडे येथे विहीर खोदताना करण्यात आलेल्या ब्लास्टच्या आवाजाने नागरिक भयभीत

0
58

अलिबाग

अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथे जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेतील कामाची विहीर खोदताना मोठा ब्लास्ट केल्याने सभोवताली असणाऱ्या घरांना हादरा बसला असल्याने नागरिक भयभीत झाले आहे.

धोकवडे येथे शासनाच्या जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत विहिरीचे काम सुरू प्राथमिक शाळेजवळ सुरू आहे.

सदर विहीर खोदण्यासाठी सुरुंग लावण्यात आले.त्या सुरुंगाचा ब्लास्ट सकाळी बाराच्या सुमारास करण्यात आले.त्यावेळी सभोवताली असणाऱ्या घरांना मोठा हादरा बसल्याने नागरिक हे घराबाहेर पडले.

त्या ब्लास्टमुळे एक मोठा दगड अंगणात उडून आला त्यावेळी घरात असणाऱ्या मुलासहित नागरिक अधिक भयभीत झाले होते.

त्याचप्रमाणे विहिरीच्या कामापासून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या थ्री फेज पोल व ट्रान्सफॉर्मर च्या अगदी जवळच असल्याने ब्लास्टची जाळी विजेच्या तारांवर पडून परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला.

ब्लास्टिंगचे काम सुरू असताना अधिकारी वर्ग उपस्थित नव्हते. त्यामूळे धोकावडे येथील ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.