चौक
परम पवित्र रमजान निमित्ताने तुपगाव-चौक येथे यासिन भालदार व कुटुंबीय यांच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व धर्मीय समाज बांधव उपस्थित होते.
हा परम पवित्र महिना असल्याने अल्लाचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी रोजा ठेवला जातो. या परम पवित्र महिन्यात व्यसन करणे,जबरदस्तीने उलटी काढणे,वाईट संगीत ऐकणे याला बंदी असून या महिन्यात चांगल्या कामाचे पुण्य प्राप्त होते.
या महिन्यातील नमाजाने सत्तर पटीने पुण्य प्राप्तीबरोबर नरकाचे दरवाजे बंद केले जातात. अशी माहिती यासीन भालदार यांनी दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक युवराज सूर्यवंशी,जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी उपसभापती श्याम साळवी,आर.पी.आय.चे तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर,वारकरी संप्रदायाचे हभप.वसंत कुंभार यांनी समाजात एकोपा कसा ठेवता येईल,अफवांवर विश्वास न ठेवता सर्वधर्म एकत्र राहील यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
रोजा सुटल्या नंतर उपस्थित सर्वधर्म समाजबांधवांना मशीद दाखवून त्यातील पवित्र कार्याची माहिती देण्यात आली.
शरीफ,सत्तार,कादिर,महमद,अजय मोरे,योगेश गुरव,रामदास साळवी यांच्यासह सर्व समाजातील लोक उपस्थित होते.