जन्म. २१ मार्च १९१४
अभिनेते आगा यांचे पूर्ण नाव आगाजान बेग होते. आगा म्हणजे हास्य अभिनेते आय. एस. जोहर प्रमाणेच हॉलिवूड चे हास्य कलाकार बॉब ऑल्ड्रीन होप पासून प्रेरित झालेले हास्य कलाकार होते. १९३५ साली आलेला चित्रपट ‘स्त्री -धर्म’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. आगा यांनी पुढे १९३७ साली आलेल्या दौलत या चित्रपटा काम केले. आगा यांनी बॉलीवूड मध्ये हास्य अभिनेता म्हणून जी जागा मिळवली ती शेवट पर्यत टिकवून ठेवली. इन्सानियत,परिवार,उडनखटोला,नवरंग,पतिता इत्यादी किमान ५५ चित्रपटात त्यांनी हास्य अभिनय केला होता. त्यांनी आपल्या करीयर मध्ये जवळ जवळ ३०० चित्रपटात अभिनय केला. त्यांना १९६० साली घुंघट या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेता पुरस्कार मिळाला होता. जलाल आगा हे आगा यांचे चिरंजीव. आगा यांचे काही चित्रपट जब जब फूल खिले,पतिता ,घुघंट , उड़न खटोला,MR MRS 55.
अभिनेते आगा यांचे ३० एप्रिल १९९२ रोजी निधन झाले.