जन्म.१ सप्टेंबर १९७७
पुण्याच्या आशय फिल्म क्लब व किर्लोस्कर-वसुंधरा या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे प्रमुख वीरेंद्र चित्राव यांचे विनय (मंदार) हे धाकटे बंधू. अत्यंत मनमिळाऊ, दांडगा जनसंपर्क आणि मदतीस कायम तयार असलेल्या विनय चित्राव यांची गांधर्व संगीत महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. पं. भीमसेन सवाई गंधर्व महोत्सव, पुलोत्सव, आशय फिल्म व सांस्कृतिक क्लब इत्यादी संस्था व महोत्सवांमध्ये ते हिरीरीने सहभागी होत असत. अनेक मान्यवर गायक, वादक कलाकारांना विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी साथ संगत केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भारतीय जनता पार्टी यांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. भाजपाचे खूप मोठे नेते विनयला व्यक्तिशः ओळखत होते पण विनयनं एका पैश्याचाही स्वार्थ कधी साधला नाही. गाणं शिकवणं आणि प्रिटींगची कामं या दोन व्यवसायातूनच त्यानं चरितार्थ चालवला. अविवाहित होता. अत्यंत साधी राहणी आणि साधी जीवनशैली असलेला संपूर्ण निस्वार्थी कार्यकर्ता. पुण्यातील संघाच्या नसलेल्याही अनेक संस्थांशी तो जोडलेला होता. विनय (मंदार) चित्राव यांचे करोनामुळे २१ एप्रिल २०२१ रोजी निधन झाले.