चौक,. (अर्जुन कदम) सर्व मतदार यांनी आपले आधारकार्ड मतदान ओळख पत्राशी लिंक करून घ्यावे असे आवाहन तहसिलदार आयुब तांबोळी यांनी केले आहे.
निवडणूक शाखा खालापूर यांच्या वतीने मतदार यांच्याकडून मतदार यादीतील तपशीलाशी आधार क्रमांक सलग्न करण्याचा कार्यक्रम व नमुना नं.६ ब चे वितरण आणि जनजागृती करण्यासाठी खालापूर येथील नेताजी पालकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास निवडणुक नायब तहसिलदार,नायब दशरथ भोईर, नायब तहसीलदार विजय पुजारी, नायब तहसीलदार राजश्री जोगी यांच्यासह मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.