खालापूर शहरातील श्री नरहर (आण्णा) पाटील यांच्या घरी श्री स्वामी समर्थ मठ  गेले 34 वर्षांपासून आहे.येथे नित्य नियमित स्वामी समर्थ सेवा होत असून स्वामी सेवकांनी नवीन जागेवर  स्वामी समर्थ मठाचे भूमिपूजन केले.

समीर पाटील व नरहरी पाटील यांच्या हस्ते  भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर नगर पंचायतचे नगरसेवक संतोष जंगम,महेश जाधव नगरसेविका लता लोते, उज्वला निधी,सुप्रिया साळुंखे उपस्थित होते.
भूमिपूजन सोहळ्यासाठी श्री सवेंद्रनाथ गुरू देवेंद्रनाथजी गुरुजी हे मढी वरून उपस्थित होते. त्यांच्या सोबत यादवेन्द्र नाथ गुरू शंकर महाराज व अशोक परब
तसे स्वामी सेवक दीपक बोदार्डे ,सुधीर म्हात्रे,काका निगडे,पप्पू पाटील, मिलिंद चाळके,महेश चाळके, मंगेश चौधरी,उमेश गावंड,महेश राठी ,हेमलता चिंबुळकर,वर्षा निजामपूरकर ,कैलास वाडेकर ,गौरव जगताप नितीन पाटील आदी स्वामी सेवक श्री स्वामी समर्थ मठ उभे राहण्यासाठी मेहनत घेत आहेत.