जन्म. २१ एप्रिल १९१०
गंगेत घोडं न्हालं या मराठी चित्रपटापासुन प्रेरित होऊन आर.सी.तलवार यांनी १९६३ मध्ये एक दिल सौ अफसाने हा चित्रपट काढला होता. एक दिल सौ अफसाने या चित्रपटात राजकपूर आणि वहिदा रहमान यांनी अभिनय केला होता. संगदिल हा आर सी तलवार यांचा चित्रपट हा Charlotte Bronte यांची नावेल “Jane Evre” यावर बेतलेला होता. या चित्रपटाला सज्जाद हुसेन यांनी संगीत दिले होते. यातील वो तो चले गए ऐ दिल, यादोंसे उनकी प्यार कर आणि ये हवा ये रात ये चांदनी तेरी इक अदापे निसार है ही दोनही गाणी खूपच लोकप्रिय झाली होती. आर.सी.तलवार यांच्या मेमसाब मध्ये शम्मी कपूर, मीना कुमारी अशा कलाकारांसोबत किशोर कुमार यांची ही भूमिका होती. आर. सी तलवार आणि किशोर कुमार यांच्याशी संबंधित आणखी एक मजेशीर किस्सा आहे.एकदा ते चित्रपट निर्माते आर. सी. तलवार यांच्याबरोबर काम करत होते. मात्र या सिनेमासाठीसुद्धा आर. सी तलवार यांनी त्यांना अर्धेच पैसे दिले होते. त्यामुळे किशोर कुमार रोज सकाळी त्यांच्या घरासमोर जाऊन बसायचे आणि तलवार यांना बघून ओरडून म्हणायचे, हे तलवार, दे दे मेरे आठ हजार… हे तलवार, दे दे मेरे आठ हजार….