रसायनी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञा सुर्य, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती रिस कांबा येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सम्यक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सुनील निकाडे व उपस्थित मान्यवरांनी डॉ बाबासाहेबांच्या जिवनचरीत्रावर प्रकाश टाकला.यावेळी प्रकाश गायकवाड यांनी बोलताना सांगितले की बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वोत्कृष्ट घटना दिली.

सर्व पिढ्यांनी त्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.बाबासाहेबांचे जीवनकार्य सर्वांनी अभ्यासले पाहिजे असे सांगून डॉ बाबासाहेबांच्या कार्यांला पुढे नेण्याचे काम सर्वांनी मिळून करावे असेही सम्यक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी बोलताना सांगितले.

यावेळी सम्यक संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन सुनील निकाडे यांनी पाहिले.