खोपोली, (वा.) खालापूर तालुक्यातील खोपोली पाली रोडवर उंबरे येथे नव्याने होत असलेल्या कंपनीची संरक्षण भिंत कोसळून सहा कामगार जखमी झाल्याची घटना घडली असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. उंबरे येथे नव्याने कंपनी स्थापित होत असून तिच्या संरक्षण भिंतीचे काम चालू होते. ही भिंत चाळीस ते पन्नास फूट उंचअसून तिचे काम चालू होते. या भिंतीवर कामगार काम करत असताना अचानक ती भिंत कोसळल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली कामगार अडकून जखमी झाले आहेत.
जखोटिया रुग्णालयात दाखल
यात धरमदेव (२५) राकेश राजभर (२१) मंजित चव्हाण (२०) जितेंद्र (३७) राम समूज (४३) प्रेम सागर (२२) हे कामगार जखमी झाले आहेत. त्यातील सहा कामगारांना तात्काळ बाहेर काढून खोपोली येथील जाखोटीया हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेतील सहा कामगार चिंताजनक जखमी आहे. असून त्यातील एकाची प्रकृतीचिंताजनक आहे