खोपोली खालापूर येथील लोकवस्तीत गेल्या २५ वर्षापासून अनेक रुग्णांना सातत्यपूर्ण सेवा देणाऱ्या ३२ डॉक्टरांचा सन्मान ‘डॉक्टर डे’ दिना निमित्त इनरव्हील क्लब आणि रोटरी क्लब ऑफ खोपोली यांच्या पुढाकाराने डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून I.M.A.माजी अध्यक्ष ,महाराष्ट्र स्टेट ऑफ रोटरी क्लब डॉ.अविनाश बोंधवे , इनरव्हील क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षा सारिका धोत्रे , सेक्रेटरी जयश्री कलोशी,रोटरी क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष सुरेंद्र जोशी, सेक्रेटरी मिलिंद बोधनकर यांच्यासह दोन्ही संघटनेचे सर्व पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरांना सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.