जन्म. १५ एप्रिल १९६३
अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून मनोज प्रभाकर याने मोलाचे योगदान दिले. एक उत्कृष्ट बॅट्समन आणि बॉलर या दोन्ही भूमिका बजावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत त्याने आपले स्थान निर्माण केले होते. मनोज प्रभाकरची ३९ कसोटींमध्ये एका शतकासह १६०० आणि ९६ विकेट्स तसेच १३० वनडे सामन्यांत दोन शतकांसह १८५८ धावा आणि १५७ विकेट्स ही कारकीर्द आहे. इन आणि आउट स्विंगरसह स्लोअर चेंडू टाकण्यात प्रभाकरची हातोटी होती. १९९६ वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर पुढील सामन्यात त्याला वगळण्यात आले. १९९६ साली त्याने या खेळातून निवृत्ती स्वीकारली होती.
१९८६ साली मनोज प्रभाकरने संध्या सोबत लग्न केले होते त्यांना रोहन नावाचा एक मुलगाही आहे. परंतु २००८ साली दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. पुढे बॉलिवूड अभिनेत्री फरहीन सोबत त्याने दुसरा संसार थाटला. फरहीन हिने बॉलिवूड मधील “सैनिक” हा ब्लॉकबस्टर सिनेमा साकारला होता. त्यात तिने अक्षय कुमारच्या बहिणीचा (मिनी ) रोल निभावला होता. १९९२ साली “जान तेरे नाम” ह्या चित्रपटातून तिने प्रमुख भूमिका बजावली होती. आग का तुफान, फौज, नजर के सामने या चित्रपटासोबत तिने कन्नड आणि तमिळ सिने सृष्टीत देखील पाऊल टाकले होते. मध्यंतरी चित्रपटातून गायब झालेली फरहीन २०१४ साली पुन्हा पदार्पण केले. ९० च्या दशकात फरहीनला माधुरी दीक्षितसारखी दिसणारी अभिनेत्री असेही म्हटले जात होते. त्यामुळे फरहीनकडे त्याकाळी दमदार चित्रपटांची रांग लागली होती.