रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील सकल मराठा समाज चावणे विभागाचे अध्यक्ष महादेव कचरे, सचिव योगेश पाटील व उपाध्यक्ष अनंता मोरे यांच्यावतीने परीसरातील दहावी,बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करीयर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सकल मराठा क्रांती मोर्चांचे समन्वयक विनोद साबळे उपस्थित होते.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ प्रतिभा महिंद्रकर,शिक्षिका अमृता पाटील,प्रताप नारकर यांनी मार्गदर्शन केले.यावेळी करियर मार्गदर्शन करताना मोबाईलचा वापर कमी करावा, अडचणीत अनुभवी माणसाचा सल्ला घ्यावा.आर्टंस,काॅमर्स,सायन्स कोणत्याही साईंटने शिक्षण घेणे कमी नाही,कुठूनही करीयर होतो असे मार्गदर्शकांनी बोलताना सांगितले.यावेळी परिसरातील शाळांत दहावी, बारावी व पदवीधर यांत प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी सरपंच भारती चितळे, सरपंच रिया कोंडीलकर,तानाजी पाटील,हभप मारुती महाराज पाटील,हभप श्रीकांत पाटील, ॲड.संजय टेंबे,शंकर गोडीवले, गणेश भोईर,दिपक देशमुख,वामन पाटील, गणेश पवार, संदिप गोडीवले,बाळा महाडिक,हरीदास पाटील,मनोज पाटील,अंकूश भौड, चंद्रकांत पाटील,बाबू कदम आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष महादेव कचरे, उपाध्यक्ष अनंता मोरे,सचिव योगेश पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.