खालापूर पंचयत समिती शिक्षण विभाग विज्ञान गणित मंडळ व खालापुर तालुका शिक्षण मंडळ परम पूज्य गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कुल खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालयात 52 वे दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनात केटीएसपी मंडळाचे प.पू गगनगिरी महाराज इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना अँटोमँटीक फायर फाटर प्रतिकृतीला प्रथम क्रंमाक मिळविल्याने चॅम्पियन ट्रॉफीचा बहुमान मिळाली आहे. तर दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प.पू गगनगिरी महाराज इंटरनॅशनल स्कूल, ज्युनिअर कॉलेजला यजमानपद मिळाल्यानंतर योग्य नियोजन केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी यांनी प्राचार्य गौरव तिवारी आणि सर्व शिक्षकांचे कौतुक केले आहे. खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे प. पू गगनगिरी महाराज इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजमध्ये खालापूर तालुका दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मोठ्या दिमाखात केले होते. खालापूर तालुक्यातील जि.प.शाळा, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील एकून 102 विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेत विविध विषयांवर प्रतिकृती सादर केली होती. शिक्षण अधिकारी रायगड माध्यमिक विभाग महारुद्र नाळे, उपविभागीय पोलिसअधिकारी विक्रम कदम यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देवून विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले होते.

परिक्षकांनी योग्य परिक्षण करीत प्रत्येक गटाचे क्रमांक काढल्यानंतर बी.एल. पाटील तंत्रनिकेतनच्या सभागृहात बक्षिस वितरण खोपोली पोलिस ठाण्याच्या पोलिस उप निरिक्षण पूजा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. रायगड जिल्हा उप शिक्षण अधिकारी सुनील भोपळे, खालापूर गटशिक्षण अधिकारी कैलास चोरमाळे, श्री छत्रपती विद्यालय देवन्हावे अध्यक्ष भास्कर लांडगे, बी.एल. पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने, जनता विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप देशमुख प.पू. गगनगिरी इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य गौरव तिवारी, विस्तार अधिकारी शिल्पा दास, तालुका विज्ञान अध्यापक सुखदेव आव्हाड, अर्पिता चव्हाण, सचिव ज्ञानदेव बीचकर, खजिनदार राजेंद्र गावडे, शिक्षक संघटनेचे संतोष पाटील यासह अन्य मान्यवर या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट मांडणी करून जगाला संदेश देणारे वास्तव सादरीकरण करणारे प्राथमिक गट जे.सी. एम. एम खोपोली प्रथम आफरिन अनवरपिंजारी मर्गदर्शक बबिता मॅडम , द्वितीय क्रमांक कारमेल स्कुल रुपम हेगडे मर्गदर्शक शिक्षक गुंजाल जयस्वाल, तृतीय क्रमांक श्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय खोपोली पौर्णिमा मर्चडे मार्गदर्शक शिक्षक सिद्धार्थ सर, माध्यमिक गट इयत्ता 9 ते 12 वी मध्ये प. पूज्य गगनगिरी महाराज ज्युनियर कॉलेज खोपोली प्रथम क्रमांक आदित्य सुरजित सिंह मार्गदर्शक शिक्षक सौ शाजमीन मॅडम, द्वितीय जनता विद्यालय खोपोली नेहा कडू मार्गदर्शक शिक्षक, मसुरकर, तृतीय कारमेल स्कुल खोपोली कु. सोहम प्रमोद गायकर मार्गदर्शक शिक्षक दर्शना पिंगळे, प्राथमिक गट शिक्षक – प्रथम राजिप शाळा करंबेली सुदर्शन आंधळे, द्वितीय क्रमांक राजिप शाळा मोहपाडा सौ. रुपाली पाटील, तृतीय क्रमांक रा.जि शाळा कांढरोली सौ जयश्री सुर्वे, माध्यमिक शाळा गट शिक्षक प्रथम क्रमांक नरेंद्र म्हात्रे खोपोली नगर परिषद विद्यालय ताकई, द्वितीय क्रमांक सौ. पूनम दळवी सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक, तृतीय क्रमांक इम्रान मुजावर प.पूज्य गगनगिरी स्कुल यांना स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.