डॉ.कुंदा आणि सुभाष महादेव दोंदे चॅरिटेबल ट्रस्ट. संचालित .सुभाष महादेव दोंदे मेमोरियल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर .खोपोली. या कार्यशाळेतील मुलींनी खोपोली पोलिस स्टेशन मधील अधिकारी व पोलीस वर्ग यांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी केली. महीला पोलीसांनी शाळेतील मुलांना राख्या बांधल्या .खोपोली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिरीष पवार  यांनी मुलांचे खुप कौतुक केले सर्व मुलांना खाऊ व भेटवस्तू देऊन मुलांचे कौतुक केले यावेळी शाळेच्या अध्यक्ष डॉ. कुंदा दोंदे यांनी श्री.शिरीष पवार  यांचे विशेष आभार मानले. शाळेच्या विश्वस्त माया कुलकर्णी व कुसूम रावळ यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली .शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता अमर निळकंठ यांनी श्री. शिरीष पवार  आणि सर्व पोलीस स्टाफ यांचे अमुल्य वेळ देवून शाळेचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमात 25 मुले पालकवर्ग सहभागी झाले होते.