खोपोली, खालापूर:सहज वृत्तसेवा
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहन अपघातांची मालिका सुरूच आहे. बुधवारी कारला झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले.
कार चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारचालक वसंत सदाशिव सैद वय ६२, त्यांची पत्नी कल्पना वसंत सैद (वय ५७ रा- हणार नवी मुंबई), लक्ष्मण रामभाऊ शिंगोटे वय ६० आणि कविता लक्ष्मण शिंगोटे वय ५८ राहणार ठाणे जखमी झाले आहेत. वसंत हे त्यांच्या ताब्यातील कार घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने बुधवारी दुपारी निघाले होते मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत आडोशी उतारावर वसंत यांचे कार वरील नियंत्रण सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञातवाहनाला त्याची जोरदार धडक बसली. धडकेत कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. यामध्ये कार मधील चौघेजण गंभीर जखमी झाले होते.
अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, आय आर वी पेट्रोलिंग, देवदूत टीम, डेल्टा फोर्स तातडीने पोहोचले जखमीना रुग्णवाहिकेतून उपचाराकरता एमजीएम रुग्णालय कामोठे येथे पाठवण्यात आले असून कल्पना आणि वसंत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक बाधित झाली होती परंतु अपघातग्रस्त वाहन हलवून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.