कर्जत । कर्जत-नेरळ राज्यमार्गावर बुधवारी (२५ डिसेंबर) सकाळी साडेअकरा बारा वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातानंतर दोन दुचाकीचालकांमध्ये वाद सुरु आणि गर्दी जमली. गर्दी पाहून, त्यातील एक दुचाकीचालक गाडी तेथेच टाकून अन्य सहकाऱ्यांसह घटनास्थळावरुन पसार झाला. त्यामुळे संशय आल्याने, पोलिसांनी घटनास्थळावरील स्कुटीची तपासणी केली असता, तिच्या डिक्कीत गांजा आणि चरस या अंमली पदार्थांची पाकीटे सापडली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाताळच्या सुट्टीमुळे रायगडात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून, रस्त्यांवरन वाहनांची संख्या बादली आहे. बुधवारी कर्जत कल्याण राज्यमार्ग सस्त्यावर सकाळी साडेअकरा बारा वाजण्याच्या सुमारास एक पल्सर, एकटीव्हीएस स्कुटी आणि सिटी होंडा कार या तीन वाहनांचा कोषाले येथे अपघात झाला. त्यावेळी या तिन्ही गाड्यांचेमालक हे एकमेकांशी भांडू लागले. गर्दी जमू लागल्याबर पल्सर गाडीवरुन दोन तरुण पळून गेले. अपघात झाल्याचीमाहिती मिळताच कर्जत चारफाटा येथे बंदोबस्त कदरीत असलेले वाहतूक पोलीस तेथे पोहचले. त्यावेळी कर्जत पोलीस ठाण्यातून आणखी काही पोलीस तेथे पोहचले आणि पोलिसांनी टीव्हीएस स्कुटी गाडीची उघडी असलेली डिकी तपासली असताना त्यामध्ये गांजा आणि चरस या अंमली पदार्थ्यांची पाकिटे आढळून आली. त्यामुळे कारचालकही कोणतीही भरपाई न मागता तेथून निघून गेला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एमएच ०४. केएन ९३५३ या क्रर्माकाच्या टीव्हीएस स्कुटी गाडीच्या डिक्कीत अंमली पदार्थ आढळून आल्याने पोलिसांनी टेम्पोमध्ये ती स्कुटी भरुन पोलीस ठाण्यात नेण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत.




















