खोपोली । मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बुधवारी (८जानेवारी) पहाटे एका ट्रेलर चालकाला रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याच्या शरीराच्या चिंधड्या होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ट्रेलर चालक बिकास के आर यादव (वय ३८, रा. कांतापूर, पश्चिम बंगाल) हा ट्रेलर घेवून पुण्याहून मुंबईकडे जात असताना ढेकू गावाजवळ ट्रेलरचा टायर फुटला. सदर ट्रेलर रस्त्याच्या कडेला उभा करुन चालक एक्सप्रेसवे ओलांडत असताना एका भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.