जीवनात सहा पासवर्ड वापरले तरी जिवन सुंदर जगता येते-शिवव्याख्याते प्रशांत देशमुख

चौक, 

जीवन जगताना जीवनातले सहा पासवर्ड वापरले तरी आपल्या सुखीजीवनाबरोबर इतरांचेही जीवन सुंदर होईल,म्हणून लहान मुलांच्या जीवनात असलेल्या भगवंताचे मंदिर घडविण्याचे काम शिक्षक करू शकतात, असे सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी सांगितले.

खालापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक हे कोरोना काळात विद्यार्थ्यांपासून दूर गेले होते,शिक्षक व विद्यार्थी हे एका मानसिक अवस्थेत आले होते,आता शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत,शिक्षक यांच्यात नवी ऊर्जा निर्माण व्हावी,त्यांच्यात विद्यार्थी घडविण्यासाठी नवचैतन्य निर्माण व्हावे त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव साजरा करण्यासाठी खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे जिवन सुंदर आहे हे व्याख्यान तालुक्यातील चौक,वावोशी व खालापूर येथे आयोजित केले होते.

त्याप्रसंगी प्रशांत देशमुख बोलत होते.चौक बिट अंतर्गत चार केंद्र,खालापूर बिट अंतर्गत चार केंद्र व वावोशी बिट अंतर्गत पाच केंद्रातील शिक्षक यांच्यासाठी हे व्याख्यान आयोजित केले होते.

ते पुढे म्हणाले सहा अक्षरांचा पासवर्ड माझी चूक झाली, मला मान्य आहे, पाच अक्षरी पासवर्ड हे तू फ़ारच छान केलंस,चार अक्षरी तुझं मत काय आहे, तीन अक्षरी एवढे प्लिझ करशील, दोन अक्षरी आभारी आहे व शेवटचा पासवर्ड आपण हा शब्द वापरला तर आपलं असणार सुंदर जीवन आणखी फुलत व इतरांचेही जीवन आनंदित होते.

दृढ आत्मविश्वासहा व निर्धार केल्यास,आपलं जगणं सुंदर कस होईल,बालमनासारख निरागस जगता आले पाहिजे, त्यासाठी सकारात्मक रहा सहा पासवर्ड शिक्षक यांनी भावी पिढी घडविण्यास वापरला तर आपण एका वेगळ्या उंचीवर असू असेही ते म्हणाले.

विशेष बाब म्हणजे प्रचंड उष्णतेच्या लाटेत तीनही बिट मधील सर्व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी आशा खेडकर,केंद्रप्रमुख निशा देशमुख,देविदास पाडवी,जे.पी.परदेशी यांच्यासह मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.