खोपोली : आजच्या जमान्यातही समाजात प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे याची प्रचिती देणारे उदाहरण २ डिसेंबर रोजी सीएनजी पेट्रोल पंप मालकाच्या कृत्यातून पहायला मिळाले. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील हाल गावा नजदीक असणाऱ्या माऊली एटरप्राईजेस पेट्रोल पंपात सीएनजी भरण्यासाठी आलेल्या टेम्पो चालकाकडून १ हजार ऐवजी १० हजार गुगल पे च्या माध्यमातून सेंड केले, परंतु टेम्पो चालक पेट्रोल पंपातून निघून गेल्यानंतर ही बाब पंप मालकाच्या निदर्शनास आल्यानंतर मालकाने तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधत टेम्पो चालकाचा शोध घेतल्यानंतर फोन करत टेम्पो चालकाला याचे ९ हजार रुपये परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे पेट्रोल पंप मालक श्रीमंत तांदले व बबन सानप यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आजच्या कलयुगात वेगवेगळ्या मार्गान व कमी मेहनतीत पैसा कुठून येतोय याकडे साऱ्यांचा ‘कल असतो, त्यामुळे अनेक जण पैशाच्या हव्यासापोटी वेगवेगळ्या वाईट मार्गाला लागल्याचे पाहायला मिळत असताना या कलयुगात ही प्रामाणिकपणा आजही टिकून असल्याचे अनेक उदाहरणातून पहावयास मिळत असून मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील हाल गावा नजदीक असलेल्या सीएनजी महानगरच्या माऊली एटरप्राईजेस पेट्रोल पंप मालकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे, पुणे बाणेर येथील आकाश नितनवरे हा हाल गाव नजदीक असणाऱ्या माऊली एटरप्राइजेस सीएनजी पंपात चक १२. थठ.६२९३ या क्रमांकाच्या टेम्पोमध्ये १ हजार रुपयाची सीएनजी भरली, परंतु हेच पैसे गुगल पे च्या माध्यमातून १ हजार ऐवजी १० हजार सेंड झाले. मात्र ही बाब त्यावेळेस आकाश नितनवरे समजून आली नाही. मात्र ही बाब टेम्पो चालक पंपातून निघून गेल्यानंतर पंप मालकाच्या निदर्शनास आल्याने यावेळी पंप मालकाने पोलीस ठाण्याशीसंपर्क साधत टेम्पोचा नंबर देत टेम्पो चालकाला संपर्क साधल्यानंतर २ डिसेंबर र रोजी टेम्पो चालकाला त्याचे उर्वरित ९ हजार रुपये पंपाचे व्यबस्थापक रुपेश फराट यांनी टेम्पो चालक आकाश नितनवरे यांना सुपूर्द केल्याने पंप चालकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असूनआजच्या युगात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे या उदाहरणातून पहावयास मिळाले. माऊली एटरप्राईजेस सीएनजी पंप मालक श्रीमंत तांदले यांनी याआधीही आमच्या पेट्रोल पंपात दोन ग्राहकांचे पैसे परत करण्यात आले असता यामध्ये एका ग्राहकाचे ७२ हजार व दुसऱ्या ग्राहकाचे ८ हजार रुपये त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.