पिल्लई कॅम्पसमध्ये ‘बीइ रोजगार’चा ट्रेलर संपन्न

0
36

 

भाडिपा रोजगार या मराठी वेब सिरीज च्या कलाकारांचा ट्रेलर नुकताच येथील पिल्लई कॉलेज कॅम्पस मध्ये लॉन्च करण्यात आला. यावेळी प्रमुख अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सहकारी अभिनेते संभाजी ससाने आणि जगदीश कनोम सोबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भाडीपा हा शॉर्ट फॉर्म असून भारतीय डिजिटल पार्टी हे एक प्रसिद्ध मराठी युट्युब चॅनेल आहे ज्याने फेसबुक आणि युट्युब वर दीडशे दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत.

ते कॉमेडी आणि म्युझिक व्हिडिओ सारखी सामग्री तयार करते त्यांची आगामी वेबसिरीज बीई रोजगार ह्या फिल्म मध्ये तीन अभियंते अपवादात्मक रस्ते घेतात आणि स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात याबद्दलची कथा आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मंदार भिडे यांच्या मराठी स्टॅन्ड अप ने झाली. इथे ट्रेलर चा काही भाग सांगितल्यानंतर उपस्थितां मध्ये हशा पिकला नंतर प्रेक्षागृहात तो प्रदर्शित करण्यात आला आणि त्यानंतर उपस्थित अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. प्रेक्षकांच्या या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर कलाकारांना मंचावर बोलावण्यात आले. प्रेक्षकांशी साधलेला संवाद सई ताम्हणकर ने तिच्या आणि तिच्या आगामी कार्यासाठी प्रेरक ठरेल असे सांगितले. यावेळी सहकलाकार ससाने आणि जगदीश कन्नम या दोघांनीही प्रेक्षकांशी संवाद साधला. आणि वेबसीरीज मध्ये काम करतानाचा अनुभव सांगितले.