रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलिस ठाण्याने, दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावांमध्ये हिंदू मुस्लिम भाईचारा वाढावा, अमन व शांती टिकून राहण्यासाठी व या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून जग भरात चालू असलेल्या हिंदु-मुस्लिम वादाला संपवण्यासाठी व‌‌ समाजात हिंदू मुस्लिम भाईचारेचा जनमनात चांगला संदेश जाण्याच्या हेतूने दिघी सागरी पोलीस ठाण्यातर्फे एक‌ चांगले पाऊल उचलले आहे.

सालाबादप्रमाणे या वर्षीही श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीस स्टेशन पोलिसांनी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री अशोक दुधे साहेब यांच्या आदेशाने दिघी सागरी पोलीस ठाण्यात DYSP  प्रशांत स्वामी यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये लहान मुले व तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. संख्या मगरिबचा अजान ऐकून सर्व हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकांनी एकत्र बसून इफ्तार केला.

एप्रिल महिन्याच्या कडाक्याच्या उन्हातही मुस्लीम समाजातील लोक आपल्या परमेश्वराची उपासना करण्यासाठी १४ तास उपाशी आणि तहानलेल्या राहून दिवसातून ५ वेळा नमाज अदा करतात.

अशा प्रकारच्या इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याने परस्पर बंधुभावही वाढतो.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप पोमण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ” उपवास म्हणजे सर्व वाईट गोष्टींपासून दूर राहणे. उपवास करताना तो दिवसभर भुकेलेला आणि तहानलेला असतो. तसेच एखाद्या ठिकाणी लोक कोणाचे वाईट करत असतील तर अशा ठिकाणी रोजेदारांना उभे राहण्यास मनाई आहे. जेव्हा एखादा मुस्लिम उपवास करतो तेव्हा त्याच्या हृदयात भुकेल्याबद्दल सहानुभूती निर्माण होते. रमजानमध्ये, पुण्य कर्मांचा कालावधी सत्तर पटीने वाढविला जातो.”

या इफ्तार पार्टी करिता DYSP  प्रशांत स्वामी , दिघी सागरी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप पोमण ,मोहम्मद  मेमन , सुकुमार तोंडलेकर, शाम  भोकरे, उदय बापट, महेश पिळणकर, तसेच नागाव व बोर्ली मुस्लीम समाज अध्यक्ष
मजीद झोंबरकर, मन्सूर गिरे इत्यादी बांधवांनी आपलीं उपस्थिती दर्शविली.