सहज सेवा फाऊंडेशनचा कर्जत-खालापूर तालुक्यातील महत्त्वाच्या वैद्यकिय उपक्रमाची मुहूर्तमेढ …
खोपोली…
सहज सेवा फाऊंडेशन समाजातील विविध गरजा ओळखून प्रभावी सामाजिक कार्य करीत असते. आजारामध्ये अनेकवेळा मदत बहुतांशी जनतेला आवश्यक असते,परंतु योग्य वेळी मदत न मिळाल्याने अनेक वेळा कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागते.नागरिकांची विविध स्तरातून होत असलेली मागणी लक्षात घेता सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून जनतेस विविध स्तरातून शक्य ती मदत मिळवून देणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ रविवार 11 डिसेंबर 2022 रोजी सहज सेवा जनसंपर्क कार्यालय,खोपोली येथुन करण्यात आला.
महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना,आयुष्यमान भारत योजना,मुख्यमंत्री सहाय्यता निधी, इ.एस.आय.सी.,धर्मादाय आयुक्त हॉस्पिटल मार्गदर्शन,विविध प्रकारच्या अल्प दरात व निःशुल्क होणाऱ्या वैद्यकिय चाचण्या,मोतीबिंदू संदर्भातील मार्गदर्शन,सतत लागणारी औषधे निःशुल्क अथवा सवलतीच्या दरात असणारी उपलब्धता,देहदान व अवयवदान संदर्भात मार्गदर्शन,कॅन्सर संदर्भात मार्गदर्शन,अत्यावश्यक रक्त सेवा मार्गदर्शन,प्लॅस्टिक सर्जरी संदर्भात मार्गदर्शन,निःशुल्क कृत्रिम हात-पाय तसेच कानाची मशीन संदर्भात मार्गदर्शन,मोठया आजारात काही ट्रस्ट कडून मिळणारी आर्थिक मदत संबंधित माहिती,काही निःशुल्क व कमी दरात सुविधा देणारे हॉस्पिटल्स यांची माहिती,अल्प दरात भाडे तत्वावर वैद्यकीय उपकरणे,
रुग्णवाहिका,कार्डियाक रुग्णवाहिका,शव पेटी संदर्भातील मार्गदर्शन यासाठी माहिती देणारा हा उपक्रम कर्जत खालापूर तालुक्यातील जनतेसाठी उपयुक्त ठरेल.
याप्रसंगी खोपोलीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व खोपोली मुस्लीम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आतीक खोत यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले तर ब्राह्मण सभा खोपोलीचे अध्यक्ष अनीलकुमार रानडे यांच्या हस्ते मेडिकल हेल्प सेंटरच्या मदतीसाठी लागणाऱ्या फॉर्मचे प्रकाशन करण्यात आले.
हा उपक्रमाचा चंद्रकांत फावडे,मंगेश मोरे,संजय बोंदार्डे,डॉ.बबन नागरगोजे,नरेंद्र हर्डीकर,दाऊद शेख,अनिल मिंडे,रशीद शेख,अदनान शेख,राकेश धोत्रे,आनंद आखाडे,सचिन महाराज तांडेल,नामदेव मोरे,अविनाश जाधव,प्रसाद विध्वंस,श्वेता पाटील,अक्षय थोरात,तुषार खोपे,सुधीर मस्के,आयुब खान,शेखर बोराडे,दीपक सूर्यवंशी,ॲड.प्रिया गुरव,राजश्री पाटील, वसंत कुंभार,नईम खान, अरुण नलावडे,प्रशांत गोपाळे,महबूब जमादार,संदीप ओव्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार,सचिव वर्षा मोरे,खजिनदार संतोष गायकर, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,महिला संघटक नीलम पाटील, मार्गदर्शक मोहन केदार, खालापूर तालुका प्रमुख तोफिक कर्जीकर,राकेश ओसवाल,योगिता जांभळे,डॉ.रक्षा मालोदे,बंटी कांबळे,सचिन गवळी यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नकुल देशमुख यांनी केले.
या उपक्रमासाठी अनिल खालापूरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
आरोग्य संदर्भात माहिती व मदतीसाठी
सोमवार ते शनिवार रोजी सकाळी 10.00 ते 11.00 या वेळेत सहज जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधुन मदत मिळवण्याच्या या उपक्रमाचे कौतुक करताना समाजातील गरजु घटकांना ही मदत मिळेल व अत्यावश्यक असणाऱ्या या उपक्रमात समाजास नक्कीच मोलाची मदत होईल असा आशावाद आतिक खोत यांनी व्यक्त केला.