खोपोली..

खोपोली पोलीस दलात कार्यरत असलेले सचिन नागेश घरत यांचा गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय,नाशिक येथे 31/10/2022 ते 12/11/2022 या कालावधीत घेण्यात आलेल्या सेवांतर्गत पी.एस. यु.-2 चे प्रशिक्षण सत्र क्रमांक -1 मधील समाविष्ट अभ्यासक्रमावरील लेखी परीक्षेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आला आहे.
सन 2002 साली रायगड जिल्हा पोलीस दलात भरती झालेले सचिन घरत हे अतिशय हुशार, संयमी,उत्कृष्ट वक्ते असुन त्यांच्याकडे कोणीही तक्रारदार यांनी तक्रारी स्वरुप प्रश्न विचारल्यास ते त्यांच्यातील ज्ञानाने त्याचे योग्य व अचूक उत्तर देवून मार्गदर्शन करीत असतात. सचिन घरत यांची विचारशक्ती प्रगल्भ असुन शाळेतील मुलांना आदर्श विचार सांगणारे, शालेय जीवनात मुला-मुलींना येणाऱ्या अडचणींची जाणीव ठेवून शिक्षकांकडे तक्रार करुन मत मांडणारे, कर्तव्यात व्यस्त असूनही परीवार व सामाजिक कार्यात देखील तत्पर असणारे सचिन घरत हे आदर्शवादी व्यक्तिमत्त्व आहे.
या कौतुकास्पद कामगिरीबद्दल सचिन घरत यांचे सर्वत्र कौतुक होत असुन मान्यवरांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.